प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ तुषार निकाळजे :
पुणे:- काहीतरी वेगळे करण्याची उर्मी प्रत्येकाला असते आणि ह्याच भावनेतून व नागरिकांना व्यायामाची जाणीव व्हावी तसेच आपले शरीर निरोगी रहावे यासाठी स्पोर्टिफ़ाय रनिंग ग्रूप धानोरी पुणे कायम नव-नवीन व धाडसी उपक्रम राबवित असते. २०२१ मध्ये धानोरी ते सिंहगड रिले रेस ४२ किमी फक्त ३ तासात ४३ मिनिटे मध्ये पूर्ण केली होती. ह्यावर्षी रविवार १६ ऑक्टोबर ला स्पोर्टिफ़ाय रनिंग ग्रूप ने धानोरी ते जेजुरी रिले रेस चे आयोजन केले होते. ह्या रेस मध्ये २५ रनर्स होते आणि ५५ किमी चे अंतर ५ तास ७ मिनिट मध्ये पूर्ण केले आहे.
धानोरी - लोहगाव - पुणे एअरपोर्ट - कल्याणी नगर - मगरपट्टा - हडपसर - फुरसुंगी - दिवे घाट - सासवड - जेजुरी असा या रन रेस चा मार्ग होता.
धानोरी ते जेजुरी ह्या रन रेस ला धानोरी हुन पहाटे ४ वाजता स्पोर्टीफाय संघटनेतर्फे मुख्य प्रशिक्षक विजय बनसोड यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. अंतिम टप्पा सकाळी ९ वाजून ७ मिनिटे वाजता खंडेरायाच्या पावन नगरीत जेजुरीत खंडेरायाचे दर्शन घेऊन संपन्न झाला.या रिले रेस मध्ये महिलांची मोठी उपस्थिती होती.
अंकित सिंग,आशिष पठाडे, आकाश होळकर,दीपक जाधव, हितेश सिरोया,किरण मोरे, किरण शिंदे,कुणाल उपाध्याय, लक्ष्मी एर्रमासू,मंगेश थोरात,मृणालिनी प्रसाद,प्रदीप राऊत,प्रज्ञा इंगळे, प्रशांत भावसार,पुष्पा मिश्रा, साधना सिंग,सागर शाह,संदीप पनवर,संदीप पाटील,श्वेता खेराज,स्मिता थोरात,श्रीकांत नुला, तुषार राऊत, वैभव नेहे, विजय बनसोड ह्या धावपटूंनी ह्या रनर्स रेस मध्ये सहभाग नोंदविला.
धावपटूंना मदत करण्यासाठी ६ सपोर्ट कार मार्गावर तैनात होत्या. रिले रेसचे नियोजन आणि मार्गदर्शन स्पोर्टीफाय टीमचे मुख्य प्रशिक्षक विजय बनसोड यांनी केले होते. या रन मधला सर्वात महत्वाचा टप्पा होता दिवे घाट,कारण हया ४ किलोमीटर च्या अंतरामधे ३०० मीटर चा चढ आहे. जिथे चालताना दमछाक होते तिथे पळायचे होते.
जेजुरी मध्ये वंदेमातरम संघटनेतर्फे सर्व धावपटूंचे स्वागत करण्यात आले व सत्कार करण्यात आला.
स्पोर्टिफ़ाय ची स्थापना २०१७ मधे पुण्यातील धानोरी येथे रनिंग व फिटनेस बद्दल जनजागृती करण्यासाठी झाली. ग्रुपने गेल्या ५ वर्षामधे धानोरी,लोहगाव,विश्रांतवाडी, टिंगरे नगर परिसरातील शेकडो लोकांना धावण्याचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण मोफत दिले आहे.तसेच ग्रुप तर्फे वर्षभर वेगवेगळे क्रीडात्मक कार्यक्रम घेतले जातात व फिटनेस मनोरंजक होईल याकडे लक्ष दिले जाते.