सण-उत्सवाच्या काळात खाजगी बसेसचे तिकीट दर शासन नियमाप्रमाणे आकारण्याचे आवाहन



 प्रेस मीडिया लाईव्ह :

अन्वरअली शेख :

पुणे  : -शासनाने सर्व खाजगी बस चालक- मालक यांना  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दिडपटीपेक्षा अधिक भाडेदर आकारण्यास मनाई केली आहे.

 दिवाळी सणाचा कालावधी सुरु होत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बस वाहतुकदारांनी विहीत दरानुसार भाडे आकारणी करावी. आपले वाहन सुस्थितीत असल्याची तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असल्याचीदेखील खात्री करावी व दंडात्मक कारवाई टाळावी. प्रादेशिक परिवहन  कार्यालयाच्या वायूवेग पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहेत.

 प्रवाशांनी खाजगी  बसद्वारे प्रवास करताना तिकीट जादा दराने  आकारण्याबाबत तक्रार असल्यास  लेखी पुराव्यासह mh14prosecution@gmail.com या ई-मेल पत्त्यावर करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post