सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत प्रमुख 36 रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असणार आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अखेर पोलिसांनी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले असून सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत प्रमुख 36 रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असणार आहे.या बाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जड, अवजड, मंदगती वाहनांना वाहतूक व पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांनाकाहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण आहेत. वाहतूक कोंडीसाठी पाऊस, रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीचे नियमन याचबरोबर शहरात सुरू असलेली अवजड वाहतूकही तेवढीच जबाबदार असल्याचे वाहतूक तंज्ञाकडून सांगण्यात आले होते.
शहरातील मध्य वस्तीत अगोदरच चिंचोळे रस्ते आहेत त्यात सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपी, एसटी बसची संख्या मोठी आहे. मागील काही दिवसांपासून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने कोंडीत भर पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरात वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी घालावी, असे पत्र महापालिकेने दोन दिवसांपूर्वी पाठविले होते. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे
सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते रात्री 10 बंद रस्त
बाजीराव रस्ता ः पूरम चौक ते सिमला ऑफिस चौक
सिंहगड रस्ता ः सावरकर चौक ते वडगाव पूल
सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायं. 4 ते रात्री 10 बंद रस्त
नेहरू रस्ता ः कृष्णराव ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज) ते मालधक्कासातारा रस्ताः कात्रज चौक ते मार्केटयार्ड
नेहरू रस्ता ः आई माता चौक ते वखार महामंडळ चौक
बिबवेवाडी कोंढवा रस्ता ः बॅंक ऑफ महाराष्ट्र ते आई माता चौक
गंगाधाम शत्रूंजय रस्ता ः आई माता चौक ते शत्रुंजय मंदिर चौक
या मार्गांवर अवजड वाहतूक 24 तास बंद
अशोका मार्ग ः मोरओढा चौक ते सर्किट हाऊस चौक, आयबी
चौक ते जहॉंगीर चौक
शिवरकर रस्ता ः संविधान चौक ते एबीसी फार्म चौक
सकाळी 6 ते रात्री 11 जड वाहतूक बंद असलेले रस्ते
सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते रात्री 10 बंद रस्ते
सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायं. 4 ते रात्री 10 बंद रस्ते
या मार्गांवर अवजड वाहतूक 24 तास बंद
शिवाजी रस्ता : स. गो बर्वे चौक ते
जेधे चौक
गणेश रस्ता ः जिजामाता चौक ते
दारूवाला पूल
लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौक ते
टिळक चौक
शास्त्री रस्ता: दांडेकर पूल ते टिळक चौक
केळकर रस्ता : टिळक चौक ते आप्पा
बळवंत चौककुमठेकर रस्ता : टिळक चौक ते
शनिपार चौक
शनिपार-मंडई रस्ता : रामेश्वर चौक ते
शनिपार चौक
वीर संताजी घोरपडे पथ : गाडगीळ
पुतळा ते शाहीर अमर शेख चौक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
रस्ता : सुभाषचंद्र बोस चौक ते
आंबेडकर पुतळा चौक
महात्मा गांधी रस्ता ः गोळीबार मैदान ते
आंबेडकर पुतळा कॅम्प
ईस्ट स्ट्रीट ः खान्या मारुती चौक ते इंदिरा
गांधी चौक
सोलापूर रस्ता ः भैरोबानाला चौक ते
सारसबाग
प्रिन्स ऑफ वेल्स रस्ता ः भैरोबानाला
चौक ते मोरओढ चौक
जंगली महाराज रस्ता ः स. गो. बर्वे
चौक ते खंडूजीबाबा चौक
कर्वे रस्ता ः खंडोजीबाबा चौक ते
वनदेवी चौक
फर्गसन रस्ता ः खंडोजीबाबा चौक ते वीर
चाफेकर चौक
लॉ कॉलेज रस्ता ः वि. स. खांडेकर
चौक ते सेनापती बापट रस्ता जंक्शन
गणेश खिंड रस्ता ः संचेती चौक ते राजीव गांधी पूल औंध
कॉंग्रेस हाऊस रस्ता ः अण्णा भाऊ साठे
पुतळा चौक ते झाशीची राणी चौक
बंडगार्डन रस्ता ः महात्मा गांधी उद्यान ते
इंजिनिअरिंग कॉलेज चौक
साधू वासवानी रस्ताः नेहरू मेमोरिअल
हॉल चौक ते जहॉंगीर चौक
शिवरकर रस्ता ः फातिमानगर चौक ते
संविधान चौक