प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात लोकसभेसह आगामी सर्व निवडणूक ताकदीने लढणार असल्याची माहिती महाराष्ट्र दौऱ्या वर असताना आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट भाई चंद्रशेखर आजाद यांनी औरंगाबाद येथे पक्ष पदाधिकारी यांना निवडणुक लढवण्याचे स्पष्ट निर्देश दिले असुन स्थानिक पातळीवर समविचारी पक्ष-संघटनांना सोबत घेण्याचे संकेत ही दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आगामी निडणुकआम्ही पूर्ण ताकतीने लडू आणि शहरातील एसीएसटी* **माइनोरेटी व ओबीसी यांनी एकत्र यावे "जीसकी जीतनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी" या तत्वावर सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल अशी माहिती रहीम भाई एम सय्यद अध्यक्ष आजाद समाज पार्टी पिंपरी चिंचवड यांनी एक मुलाखतदरम्यान दिली आहे.
तसेच विविध ठिकाणी बहुजनांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार आजाद समाज पार्टी खपउन घेणार नाही तसेच संपूर्ण देशात विविध ठिकाणी बहुजन व अल्पसंख्यांक वर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात भीम आर्मी व आजाद समाज पार्टी सर्व प्रथम रस्त्यावर उतरुन निषेध करते लढा देत आहे या साठी बहुजन अल्पसंख्यांक यांनी एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी केले.
औरंगाबाद येथील संवाद मेळाव्याआधी चंद्रशेखर आजाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात लोकसभेसह आगामी सर्व निवडणूक ताकदीने लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.