खिदमत ए आवाम या सेवभावी संस्थेने गोर् गरीब, गरजूंना मदत करत साजरी केली मोहम्मद पैगंबर जयंती



 प्रेस मीडिया लाईव्ह :

अन्वरअली शेख :

पिंपरी-चिंचवड : मुस्लीम बांधवांनी रबी उल अव्वल निमित्त केले नाष्टा वाटप, रुग्णांसाठि फळांचे व निराधार लोकांना जेवन वाटप करण्यात आले.


रबी उल अव्वल हा महिना इस्लाम व मानवते साठी ईश्वराने पाठवलेले अंतिम पैगंबर हजरत मुहम्मंद साहेब यांचा जन्म महिना. या महिन्या ला इस्लाम मधे अनन्य साधारण महत्व आहे. मुस्लिम बांधव हा महिना month of compassion म्हणजे बंधु भाव, सौहार्द अन गोरगरिबांच्या सेवेचा महिना म्हणून साजरा करतात. याच उद्देशाला अनुसर न पिंपरी चिंचवड येथील खिदमत ए आवाम या सेवभावी संस्थेने सकाळी नुरानी मस्जिदसमोर नाष्टा वाटप नंतर YCM हॉस्पिटल येथील रुग्णांना फळांचे वाटप केले. तसेच त्यानंतर गोरगरिबां मधे मोरया गोसावी मंदिर, चिंचवड गाव आणि साई मंदिर पिंपरी परिसरात जेवनाचे वाटप करण्यात आले.

यावेळी खिदमत- ए- अवाम वेल्फेअर असोशिएशनचे अशपाक बांगी, रिजवान शेख, आसिफ शेख, नईम पटेल, जावेद झेंडे, अजहर शेख, मजहर शेख, नाजीम नालबंद, हाफ़िज़ युसुफ, साबिर सयद, साबिर अली खान, शराफत अली खान, इरफान नैसर्गी, मुहम्मद समी पटेल, यासीन भाई, उपस्थित होते. तसेच महिला सहकारयां मधे जोहराबानु बांगी, फातिमा सहर पटेल, नाबिला सैयद, आयेशा इनामदार यांनी योगदान दिले.


Post a Comment

Previous Post Next Post