प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : पट्टणकोडोली - हातकणंगले तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली विठ्ठल-बिरदेव यात्रा सध्या चालू आहे.येथे बिरदेवाचे प्राचीन मंदिर असून या यात्रेत मोठे पाळणे, तसेच विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. १६ ऑक्टोबर या दिवशी रात्री १० वाजता 'ड्रॅगन रेल्वे'चा पाळण्याचा (मोठा पाळणा) मागील डबा तुटून १० फुटांवरून भूमीवर कोसळला. यात ५ जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Tags
कोल्हापूर जिल्हा