प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजीरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्यानंतर आता नोटांवरील फोटोवरून देखील राजकारण सुरु होणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणातील अनेक नेत्यांनी नोटांवरील फोटोंसाठी विविध पर्याय सुचवले आहेत. ज्यात भाजप नेत्याने थेट पंतप्रधान मोदींच्या फोटोचा पर्याय सुचवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजप आमदार राम कदम यांनी नोटांवरील फोटोबाबत ट्विट करत काही पर्याय समोर ठेवले आहेत. ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,वीर सावरकर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा देखील पर्याय सुचवला आहे. कदम यांनी थेट आपल्या सोशल मीडियावरून एडिट केलेल्या नोटांचे फोटोच पब्लिश केले आहेत. अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी ! असे कॅप्शन देखील राम कदम यांनी यावेळी दिले आहे
राम कदम यांच्या आधी आमदार नितेश राणे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली नोट पब्लिश करत ‘ये परफेक्ट है’ असे कॅप्शन दिले होते. नोटांच्या या फोटोमुळे आता नव्या राजकारणाला तोंड फुटल्याचे सध्या तरी दिसून येत आहे,