प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
कोकण विभाग शिक्षक आमदार सन्माननीय बाळाराम पाटील यांच्या सन 2021 2022 या निधीतून महाड तालुक्यातील 30 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कोकण एज्युकेशन सोसायटीचे वि.ह. परांजपे विद्यामंदिर महाड येथे करण्यात आले
कोकण विभागाचे कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील तथा कोकण विभागातील माध्यमिक शाळा आजपर्यंत विविध शैक्षणिक साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले आहे. महाडमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना शे.का. पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक शिक्षक मित्र देवा पाटील, सहकारी निरीक्षक सुशांत पाटील, सुनील पाटील तसेच अमित भोईर ,रोशन गावंड रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव अरुण उतेकर, महाड तालुका पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राठोड सर, महाड संकुलाच्या मुख्याध्यापिका शेट मॅडम ,सौ अल्पना मेहता, सौ सुचित्रा तेंडुलकर, तसेच पेण पतपेढीचे उपाध्यक्ष गणपत शेलार इत्यादी उपस्थित मान्यवर होते. आमदार बाळाराम पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक मित्र देवा पाटील यांनी शिक्षक आमदार यांच्या शैक्षणिक साहित्याच्या वाटपाबाबत सर्वांना माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साळवे सर यांनी केले. या कार्यक्रमाला महाड तालुक्यातील 30 शाळांमधील मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शिक्षक आमदार बाळाराम पाटील हे कोकण विभागात तत्परतेने करत असणाऱ्या कार्याबद्दल सर्वांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला.