गलिच्छ वातावरणात पनीरची निर्मिती करणाऱ्या शालीमार डेअरीवर कारवाई करण्यात आली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील यड्राव मध्ये ऐन सणासुदीच्या काळात बनावट पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत 4 लाख 26 हजाराचे बनावट पनीर आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील यड्रावमधील शालीमार डेअरीवर कारवाई करत गलिच्छ वातावरणात पनीरची निर्मिती करणाऱ्या शालीमार डेअरीवर कारवाई करण्यात आली. युसूफ अक्कलकोटकर यांच्या शालीमार डेअरी यांच्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर,अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.
दुधाऐवजी अन्य पदार्थांचा वापर करून बनावट पनीर तयार केले जात असल्याने डेअरी उद्योग चांगलाच चिंतेत आहे. चिंतेत आहे. बनावट पनीर उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईला दुग्ध क्षेत्रातून पाठिंबा दिला जात आहे.
केवळ पनीरच नव्हे, तर चीज, तूप, लोणी तसेच उपपदार्थदेखील बिगर दुधाच्या सामग्रीपासून तयार केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना अस्सल दुधापासून आणि बिगर दुधापासून तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ ओळखू येण्यासाठी कठोर नियमावली तयार केली पाहिजे, अशी मागणी डेअरी उद्योगातून होऊ लागली आहे. आजवर पनीर भेसळीचे मुख्य केंद्र मुंबई समजले जात होते. चार वर्षांपूर्वी मुंबईतून बनावट पनीरचे साठे जप्त करण्यात आले होते. मात्र, त्याचे लोण आता राज्यभर पसरले आहे. त्यामुळे डेअरी उद्योगातून चिंता व्यक्त केली जात आहे.