'एक पणती व्यसनमुक्तीची' शिक्षिका सौ. सविता पाटील यांचा उपक्रम
प्रेस मीडिया लाईव्ह :
देशातील नवी पिढी व्यसनमुक्त व्हावी आणि आपला देश अजून बलवान व्हावा यासाठी श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिपावली सणानिमित्त आपल्या अंगणामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या सुंदर रांगोळी रेखाटल्या. तंबाखू आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अनेक युवक तसेच प्रौढ या तंबाखूच्या व्यसनांमुळे कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यामुळे अकाली मृत्यू ओढवतो. म्हणून तंबाखू पासून समाजाने दूर रहावे आणि जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन अंतर्गत एक पणती व्यसनमुक्तीची ही रांगोळी स्पर्धा सौ. सविता पाटील यांनी घेतली. यामध्ये अनुष्का पाटील, श्रावणी पाटील, अक्षरा चौगुले, ऋतुजा शेळके, सानिका खोत, समरजित माने ज्ञानेश्वर चौगुले, अनुष्का मगदूम, तन्वी चौगुले, श्रावणी खोत, सेजल चौगुले, वेदांत चौगुले यांच्या सह 50 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी गुणानुक्रम मिळवले
श्रावणी खोत - प्रथम क्रमांक, अनुष्का पाटील आणि श्रावणी पाटील - द्वितीय क्रमांक, तन्वी चौगुले आणि समरजित माने-तृतीय क्रमांक पटकाविले
सर्व शिक्षक, मुख्याध्यापक श्री एस. डी. खोत , मुख्य कार्यकारी अधिकारी वेस्वीकरसाहेब, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत मा. समरजितसिंह घाटगे यांची प्रेरणा मिळाली.