प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : महानगरपालिका छट पूजेसाठी सज्ज राहावा म्हणून मा. नगरसेवक ईश्वर शांतीलाल परमार यांनी महापालिकेला निवेदन दिले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पंचगंगा नदी घाटावर सर्व राजश्री शाहू पूर्वेत्तर भारतीय संघ तर्फे छटपूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे .
सदर पूजा दिनांक 30 रोजी सायंकाळी पाच वाजता तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक 31 रोजी पहाटे चार ते सात या वेळेत होणार आहे.
या पुजेसाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित राहणार आहे पूजेसाठी महिला या प्रत्यक्ष नदीमध्ये उतरून पूजा करत असतात सदर पूजा दरम्यान कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये याकरिता महिलांच्या सुरक्षेतेसाठी महानगरपालिका तर्फे अग्निशमन विभागाकडील एक वाहन व कर्मचारी उपलब्ध राहावे असे निवेदनात नमूद आहे
प्रेस मीडिया लाइवः