प्रबोधन वाचनालयात दिवाळी अंक योजना सुरू



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२८, समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही साहित्य रसिकांसाठी 'दिवाळी अंक-२०२२' ही योजना सुरू केलेली आहे. 

या योजनेची सुरुवात अजीज शेडबाळे, अर्चना दातार, मल्लिकार्जुन तेगी, जगन्नाथ पोवार ,विठ्ठलदास जाजू, अल्लाबक्ष मुजावर ,प्रल्हाद मेटे इत्यादी अनेक सभासदांनी योजनेचे सभासद होऊन केली. शंभराहून अधिक वर्षाची परंपरा असलेले दिवाळी अंक हे मराठी साहित्य- संस्कृतीचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रबोधन वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी उत्तमोत्तम दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जातात. यावर्षीही तसेच अंक वाचकांसाठी उपलब्ध आहेत. तीस हजाराहून अधिक ग्रंथ आणि शंभरावर नियतकालीकांनी समृद्ध असलेल्या प्रबोधन वाचनालयाच्या दिवाळी अंक योजनेचा आणि वाचनालयातील ग्रंथ संग्रहाचा लाभ इचलकरंजी आणि परिसरातील साहित्य रसिकांनी सभासद होऊन घ्यावा.त्यासाठी प्रबोधन वाचनालय,द्वारा.समाजवादी प्रबोधिनी,५३६/१८, इंडस्ट्रीयल इस्टेट, शाहू पुतळ्याजवळ ,इचलकरंजी येथे संपर्क साधावा. असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post