प्रेस मीडिया लाईव्ह :
हुपरी : हुपरी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेले पोलीस अंमलदार विशाल वसंतराव चौगुले यांच्या पश्चात हुपरी पोलिसांनी दीपावली सणाचे औचित्य साधूनवर्गणी जमवून त्यांची मुले अधिरा (वय५) व विवान (३) या मुलांच्या भविष्यासाठी हुपरी पोलिसांनी दोन लाख रुपयांची ठेव ठेवत अनोख्या पद्धतीने माणुसकी जपली. तसेच दोन मुलांच्या नावे विमा उतरून त्याची कागदपत्रे चौगुले कुटुंबीयांकडे दीपावली पाडव्याच्या दिवशी सुपुर्द केली. तसेच दिवाळीनिमित्त कुटुंबीयांना कपडे, मिठाई, तसेच भेटवस्तू दिल्या. दिवंगत ठाण्यात कर्तव्यावर असताना पोलीस नाईक विशाल चौगुले यांचे ३ जुलैला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. ते गेली दोन वर्षे हुपरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची तब्येत बिघडलेली असतानाही किरकोळ उपचार घेऊन ते नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. काही वेळानंतर त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबामध्ये एकमेव कमावते असणाऱ्या विशाल यांच्या अकाली मृत्यूने चौगुले कुटुंबासमोर अनंत अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक
पंकज गिरी, उपनिरीक्षक गणेश खराडे, विजय मस्कर व इतर पोलीस सहकाऱ्यांनी वर्गणी काढून त्यांची मुले अधिरा व विवान यांच्या भविष्यासाठी दोन लाख रु.ची रक्कम ठेव म्हणून ठेवली. सहकाऱ्यांनी त्यांना सहकाऱ्याच्या मुलांच्या भविष्यासाठी हुपरी पोलिसांनी अनोख्या पद्धतीने जपलेल्या या माणुसकीला तोडच नाही,