प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : दौंड तालुक्यातील प्रदूषण करणाऱ्या व भेसळयुक्त गुळतयार करणाऱ्या गुऱ्हाळांवर अन्न व औषध प्रशासन विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने छापे टाकून कारवाई केली. याचे दौंड तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वरवंडपरिसरातील एका गुन्हाळावर छापा टाकून कारवाई केली होती. मात्र प्रशासनाच्या या दोन्ही विभागाने केवळ दोन-चार गुऱ्हाळांवर तात्पुरती कारवाई करून मोठी कारवाई केल्याचा गाजावाजा करण्यापेक्षा ठोस कारवाई कधी होणार..? अशी अपेक्षा कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केली आहे.
सध्या दौंड तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाने एका मुख्य मुद्द्याकडे नागरिकांचे लक्ष वेधून एका नव्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.
कॉंग्रेसने यासंदर्भात एफडीआय व एमपीसीबीच्या कार्यालयांना निवेदन दिले आहे. मात्र दिवाळी सण तोंडावर आल्याने भेसळयुक्त गुळ सामान्यांच्या व कच्च्याबच्च्यांच्या पोटात जाऊ नये. यासाठी पोटतिडीकीने व कर्तव्यास जागून कारवाई करावी, जेणेकरून ही दिवाळी आरोग्याची, भेसळीपासून वाचणारी जावी… अन्यथा अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यात 700 च्यावर गुऱ्हाळघरे सुरू आहेत. केवळ दोन – तीन गुऱ्हांळावर छापा टाकून कारवाई केली आहे, परंतु जर गुऱ्हाळ चालकांना धाक बसला नाही, तर सर्वचजण समजून घेतील की, कोणाची दिवाळी चांगली जाणार..!
याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने मर्मावर बोट ठेवत या दोन्ही प्रशासनाने कारवाई केल्याचा फार्स करू नये, अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड, कानगाव तसेच केडगाव,पारगाव, सहजपूर, खामगाव, नानगाव या परिसरातीलगुऱ्हाळांवर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, चपला व टायर व आरोग्यास घातक असलेले साहित्य मोठ्या प्रमाणात जाळले जात आहे. परिणामी गुऱ्हाळांच्या धुराड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही बहुतांश गुऱ्हाळघरे ही लोकवस्तीत आहेत. परिणामी प्रदुषणांमुळे यानागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या दौंडतालुक्यात दम्याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. यागुऱ्हाळांच्या धुरामुळे शेतपिके ही धोक्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वीकेडगाव – दापोडी परिसरातील तीन-चार गुन्हाळांवर छापाटाकून भेसळयुक्त गुळ तयार करताना पकडले होते.यावेळी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त गूळ ताब्यातहीघेतला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही वरवंडपरिसरातील एका गुन्हाळावर छापा टाकून कारवाईकेली होती. मात्र प्रशासनाच्या या दोन्ही विभागाने केवळदोन-चार गुऱ्हाळांवर तात्पुरती कारवाई करून मोठीकारवाई केल्याचा गाजावाजा करू नये, अशी अपेक्षाकॉंग्रेसने व्यक्त केली आहे