भ्रष्टाचार विरोधी समितीकडून सय्यद अझहर, सय्यद रियाजोद्दीन यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद (प्रतिनिधी ) :
सय्यद अझहर, सय्यद रियाजोद्दीन यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबदल भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतिने राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर यांनी अभिनंदन केले आहे.
सय्यद रियाजोद्दीन हे 1989 साली पोलीस विभागात रूजू झाले होते,पोलीस विभागात भरती झाल्याने प्रथम सय्यद रियाजोद्दीन यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात कंट्रोल रुमला वायरलेसवर होते.नंतर क्रांतीचौक पो,ठाणे, सिआयडीत काम केले आहे.नंतर सिटीचौक पो,ठाणे, नंतर विशेष शाखेत 35 वर्षे ईमाने ईतबारे काम केल्याने आज सय्यद रियाजोद्दीन यांना पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती (बढती) देण्यात आली आहे.
भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतिने सय्यद साबेर राष्ट्रीय अध्यक्ष,अखिल रामपुरे,अब्दुल कय्यूम,हसन शाह,शेख मुबीन,सय्यद आमेर आदींने सय्यद रियाजोद्दीन व सय्यद अझहर यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.