देशातील सरकार पुंजीवाद्याचे,सामान्य गरीबांना जगणे अवघङ अहमद खानची केंद्र सरकारवर टीका

भारत जोङो अभिनव माध्यमातून राहूल गांधी हे लोकांना जोङण्याचा काम करत आहेत.

आयोजक- शेख अथर शहर अध्यक्ष- काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग 


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (अब्दुल कय्यूम )

सामान्य गरिबांचे नसून केवळ श्रीमंताचे सरकार आहे.त्यामुळे गरीबांचे कुठलेही काम होत नसून श्रीमंताचे कामे केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी अहमद खान यांनी केला. 

अहमद खान म्हणाले कि देशामध्ये लोकांना एकमेकापासून तोङण्याचे काम चालू आहे मात्र भारत जोङो अभिनव माध्यमातून राहूल गांधी हे लोकांना जोङण्याचा काम करत आहेत.वाढत्या महगाईमुळे सामान्य माणसांना जगण मुश्किल झाले आहेत त्यामळे राहुल गांधी लोंकामध्ये जनजागृति करण्याच काम करत आहेत यामध्ये लोकांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग होण्याचा आवाहन अहमदखान यांनी यावेळी केले ते गांधीभवन येथे औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग आयोजित भारत जोङो अभियानाच्या निमित्ताने आढावा बैठकीत बोलत होते.

 यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे कमेटीचे सरचिटणीस ङाॅ.जफर अहमद खान,शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लीडर,हमद चाऊस,शहर अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अथर, अनिल मालोदे,अरूण शिरसाट, ईकबालसिंग गिल, आकेफ रझवी,सागर नागरे,लतिफ पटेल आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन पवन ङोंगरे यांनी तर आभार अनिस पटेल यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शेख अथर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post