पंधरा दिवसात गेट उघडले नाही तर भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद (अब्दुल कय्यूम ) :
औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे जुने गेट प्रवाशासाठी खुले करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे औरंगाबाद येथील स्टेशनमास्टर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथे प्रवाशांसाठी ये जा करण्यासाठी बंद जुने गेट ची सुविधा उपलब्ध होत होती. परंतु नविन इमारत तयार झाल्यावर जुने गेट करण्यात आले आहे. "आमच्या निदर्शनात आले की," दि.०३/१०/ २०२२.रोजी रेल्वे मंत्री औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर कार्यक्रमा करिता आले असताना आपण रेल्वेस्टेशनचे जुनेगेट जनतेसाठी खुले करण्यात आले होते. ते कोणाच्या आदेशाने खुले केले व ०५/१०/ २०२२.रोजी पुन्हा बंद का केले."याचे आम्हाला उत्तर द्यावे"
तसेच औरंगाबाद रेल्वेस्टेशनचे जुनेगेट प्रवाशांसाठी खुले करण्यात यावे लहानमुले तसेच रुग्न व जेष्ट प्रवाशांना ना हक त्रास सहन करावे लागत आहे. नविन इमारत पर्यंत रुग्णांना व जेष्ट नागरीक प्रवाशांना पायी जाणे अवघड होत आहे.
पंधरा दिवसात गेट उघडले नाही तर आमच्या संघटने तर्फे उपोषण, निदर्शन, आंदोलन करुन करिता रेल्वेस्टेशनचे जुने गेट त्वरीत खुले करण्यात यावे. जर १५ दिवसात आमची मागणी नुसार कारवाई केली नाही तर नाईलाज आम्हाला दाद मागावी लागेल काही अनर्थ घडल्यास आपण जवाबदार राहणार असा इशारा सय्यद साबेर सय्यद सरदार, राष्ट्रीय अध्यक्षः - भ्रष्टाचार विरोधी समिती, अब्दुल कय्युम अब्दुल रशीद भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र ऊप प्रमुख, भ्रष्टाचार विरोधी समिती मराठवाडा उप अध्यक्ष शिवाजी महादेव
काकडे, अशरफ खॉन भ्रष्टाचार विरोधी समिती शहर अध्यक्ष,शेख हमीदोद्दीन,मुसा खान, सय्यद आमेर,सय्यद अझहर आदींनी दिला आहे.