शिक्षक मतदार नोंदणी संपर्क अभियाना निमित्त पत्रकार परिषदेत घोषणा ..
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद (अब्दुल कय्यूम ) :
विभाग शिक्षक मतदार संघातून २०२३ च्या निवडणूकिसाठी भारतीय जनता पक्षातर्फे श्री किरण नारायणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दि. २२ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे उमेदवारी जाहीर केली असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किरण नारायणराव पाटील हे मराठवाडा शिक्षक मतदार संर्पक अभियान दौरा करणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेबजी दानवे, भागवतजी कराड, अतूलजी सावे,पंकजाताई मुंढे श्री संभाजी पाटील निलंगेकर आणि श्री राणा जगजीतसिंग पाटील हे ज्या पध्दतीने महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि महाराष्ट्र बळकट करण्यासाठी कार्य करतात त्याच प्रमाणे मला मराठवाडयातील शिक्षकांना न्याय देण्यासाठी उमेदवारी दिली आहे.
मराठवाडा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात एकूण आठ जिल्हे व ७६ तालूके समाविष्ठ असून संपूर्ण मराठवाडया मध्ये मतदार नोंदणी निमित्त संर्पक अभियानाची सुरुवात यापूर्वीच झाली आहे.
मराठवाडा शिक्षक मतदार संघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार असून शिक्षक मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वप्रथम भारतीय जनता पक्षातर्फे या मतदार संघातील मागील १८ वर्षापासून प्रलंबीत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करत असून विनाअनुदान शाळा, अघोषीत शाळा घोषीत करणे, त्रुटी पात्र,शाळांची यादी घोषीत करणे, २००५ नंतर नोकरीत समाविष्ठ शिक्षक बंधुना जुनी पेन्शन योजना लागू करणे, विना अनुदान शिक्षकांना सेवा संरक्षण, स्वय अर्थसहाय्यीत शाळेतील शिक्षकांना सेवा संरक्षण, २५% स्वयंअर्थ शाळेतील आर टी ई प्रमाणे फिसचे तात्काळ वितरण करणे असे अनेक विषय तात्काळ सोडविणे बाबत त्या सोबतच शिक्षकेत्तर कर्मचारी यांना न्याय मिळवून देणे असे अनेक प्रलंबीत प्रश्न सोडविण्या साठी भारतीय जनता पक्ष कटीबंध आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे या निवडणूकीचे अविरत सुक्ष्म नियोजन करण्यात असून शहर व ग्रामीण तसेच मराठवाडयातील ७६ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी काम करत असून शिक्षक परीषदेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाजप प्रणीत शिक्षक आघाडीचे कार्यकर्ते विविध शाळांना भेटी व शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अभियानात सहभागी आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निश्चित विजयी होणार.
किरण नारायणराव पाटील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय मंडळ औरंगाबाद या ठिकाणी सलग ८ वर्षे मंडळ सदस्य म्हणून काम केले असून मंडळाच्या विविध समित्यांवर काम केले आहे.
आम्ही शिक्षक आहोत आम्ही या देशाचे नागरीक या देशाची पिढी घडवण्याचे काम करतो. आणि ज्या पध्दतीने शिक्षक पिढी घडवण्याचे काम करत आहे त्याच प्रमाणे आदरणीय मोदी,अमीत शहा,जे पी नडडा साहेब हे देश घडवण्याचे कार्य करत आहेत. या देशाची घडी व्यवस्थीत करण्यासाठी पुढच्या २५ वर्षाच्या नव्हे तर ५० वर्षाचा आराखडा तयार आहे. हेच यांच्या कार्यातून दिसून येते. मला आवडलेली भाजप मधील गोष्ट म्हणजे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी मी जर जो पक्ष राष्ट्राला प्रथम स्थानी ठेवत असेल आणि शिक्षक सुदधा राष्ट्र घडविण्याचे काम करतो ही संधी भाजपा पक्षाणे मला दिली आहे त्याचे सुवर्ण संधीत रुपांतर करेन.सर्व पत्रकार बांधवांनाचा धन्यवाद शुभ दिपावली.या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवात कराड,मंत्री अतुल सावे,संजय केनेकर,किरण नारायण पाटील,गोंबिद केंद्रे, आदींची उपस्थिती होती