पुणे : आदर्श अंगणवाडी अभियान या देशव्यापी कार्यक्रमाचे प्रमुख या नात्याने सर्व देश भर हे कार्यक्रम वानाती श्रीवासन यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. याचाच एक भाग म्हणून कोथरूड मधील एक अंगणवाडी मी स्वतः दत्तक घेतली असून या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच मा. ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले.
अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी शिक्षिका /सेविका हा समाजातील तळागाळातील लोकांसाठी सरकारच्या योजना आणि व्यवस्था पुरवणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या अंगणवाडी मधून जी जी कामे केली जातात त्यांची प्रदर्शनी यावेळी आयोजित करण्यात आली होती.
या व्यवस्थेत योगदान देण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांना करण्यात आले. उपायुक्त, महिला व बालकल्याण विभाग श्री माने, श्री शिर्के, श्री टेळे यावेळी उपस्थित होते. शहर चिटणीस अनिता ताई तलाठी आणि जान्हवी जोशी यांनी परिश्रम घेतले. अंगणवाडी सेविका सुनीता खाणेकर यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल तसेच वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणारे श्री व सौ पर्बते, आणि अन्य दात्यांचे यावेळी सत्कार करण्यात आला.
(यात कोणत्याही प्रकारे आपला सहभाग नोंदविण्यासाठी संपर्क साधावा. 9422037306)
#AdarshAnganwadiAbhiyan Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
#BJP4IND #BJPGovt #BJP4Maharashtra #DevendraFadnavis #BjpMahilaMorcha