इचलकरंजीत सौ.सरस्वती धूत ट्रस्टमार्फत पोलिस बांधवांसाठी `तंदूरुस्त बंदोबस्त` उपक्रम

पोलीस अधिका-यांसह कर्मचा-यांना पौष्टीक पदार्थाचे वाटप.


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे सौ.सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्टमार्फत पोलिस बांधवांसाठी `तंदूरुस्त बंदोबस्त` हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक बी.बी.महामुनी यांच्याहस्ते विसर्जन बंदोबस्तावरील सुमारे पाचशे पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना मिनरल पाण्याची बाटली व चिक्की या पौष्टीक पदार्थाचे वाटप करण्यात आले. राजीव गांधी सांस्कृतीक भवन येथे हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

इचलकरंजी येथे सौ.सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्टमार्फत सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.विशेषत: नैसर्गिक व मानवनिर्मित संकटकाळात केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून या ट्रस्टने गरजूंना विविध माध्यमातून मदतीचा हात दिला आहे.कोरोना काळातही या ट्रस्टने गरीब , गरजूंना केलेली मदत उल्लेखनीय ठरली आहे.नुकताच राजीव गांधी भवन येथे सौ.सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्टमार्फत पोलिस बांधवांसाठी `तंदूरुस्त बंदोबस्त` हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक बी.बी.महामुनी यांच्याहस्ते विसर्जन बंदोबस्तावरील सुमारे पाचशे पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना मिनरल पाण्याची बाटली व चिक्की या पौष्टीक पदार्थाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी धूत ट्रस्टचे अध्यक्ष , उद्योजक नितीन धूत यांनी हा उपक्रम कोरोना काळातील दोन वर्षे वगळता अखंडीत सुरु असल्याचे नमूद करीत भविष्यातही हा उपक्रम अखंडपणे सुरु ठेवण्याची ग्वाही दिली. स्वागत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी केले. गावभाग पोलीस ठाण्याचे निरिक्षक राजू ताशिलदार यांनी बंदोबस्ताच्या काळात पौष्टीक पदार्थ देण्याच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

यावेळी उद्योजक श्री.धूत यांच्याहस्ते श्री. महामुनी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष सय्यद गफारी, राम मुदंडा, धनराज डाळ्या, मनोज सारडा, जहीर सौदागर, आदित्य मुंदडा, हर्षल धूत, अरुण आवटे यांच्यासह शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक अभीजीत पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक निरिक्षक विकास अडसूळ यांच्या पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post