शिरोळ तालुक्यात सैनिक फेडरेशनची बांधणी कार्यक्रम


प्रेस मीडिया लाईव्ह :

टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे

सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार माजी आमदार सुधीर सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथे माजी सैनिक फेडरेशन संघटना बांधणीची बैठक पार पडली.   

         माजी सैनिकांची ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकमताने सोडवता यावेत तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळावा तसेच सर्व माजी सैनिक एकजूट व्हावे या हेतूने मेळावा घेण्यात आला.

   शिरोळ तालुका सैनिक फेडरेशनची कार्यकरणी  बैठक मध्ये विजय पाटील, संजय माने, समीर खानोलकर ,राजेंद्र देसाई, प्रकाश खोत, बबन रजपूत, बाजीराव कोडग, प्रकाश पवार, दिनकर घाटगे, माजी सुभेदार केंदबा कांबळे, ऑर्डीनरी कॅप्टन रमेश निर्मळे, गोपाल निर्मळे, दादासो खोत, नंदू कांबळे, महादेव बदामे, अशोक नेरे ,राकेश जुगळे , इत्यादी माजी सैनिक उपस्थितीत होते . या सर्वांच्या मते शिरोळ तालुका सैनिक फेडरेशन अध्यक्ष पदी दिनकर घाटगे तसेच उपाध्यक्षपदी लक्ष्मण निर्मळे कार्याध्यक्ष राजेंद्र देसाई, सचिव बाजीराव कोडग ,सहसचिव संजय बदामे, यांची नियुक्ती झाली.

Post a Comment

Previous Post Next Post