प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९ सप्टेंबरपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ३१ जुलैच्या मध्यरात्री राऊत यांना ईडीने अटक केली होती. राऊतांनी अद्याप जामिनासाठी अर्ज केला नसल्याची माहिती मिळाली आहे. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. राऊतांना सुरुवातीला ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. मग २२ ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची सजा त्यांना सुनावण्यात आली. आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास त्यांना कोर्टात नेण्यात आलं. विशेष पीएमएलए न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.