प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व उन्नती हॉस्पिटल आणि आयसीयू पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने घोषवाक्य लेखन स्पर्धा रायगड जिल्हा परिषद शाळा करंजाडे सेक्टर 5 पनवेल येथे गुरुवार दिनांक 29 9 2022 रोजी दुपारी तीन वाजता ते पाच या दरम्यान आयोजित केले होते .
सदर स्पर्धेत 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट सुपरवायझर उन्नती हॉस्पिटल आणि आयसीयू पनवेल चे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह श्रीकांत किल्लेकर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी शाळेतील खालील शिक्षक वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळाले श्रीमती कल्याणी मंगेश लोनूष्टे श्री हेमंत गणपत मात्रे श्रीमती विद्या भास्कर पाटील सौनिता मंगलदास पाटील श्रीमती गीता हनुमंत राठोड श्रीमती संध्या पांडुरंग कोकाटे श्रीमती प्रिया लांबाते शिक्षिका उपस्थित होत्या.