प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल येथील काँग्रेस भवन सभागृहात जनजागृती ग्राहक मंच रायगड पनवेल शाखा व पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या (माहिती अधिकार शंका व समाधान) कार्यक्रम संपन्न झाला.
पनवेल दिनांक 29 सप्टेंबर 2022 स्वातंत्र भारतात नागरिकांना 30 दिवसात उत्तर मिळून देणारा हा एकमेव कायदा आहे ज्याचा वापर जनता प्रशासनाचे कामकाज तपासण्यासाठी करू शकते याकरिता तुम्हीच तुमचे नगरसेवक आमदार किंवा खासदार बना इतका हा कायदा सक्षम आहे असे भावपूर्ण उद्गार वरिष्ठ पत्रकार व माहिती अधिकार तज्ञ अनिलजी गलगली साहेब यांनी काढले पनवेल येथील काँग्रेस भवन सभागृहात जनजागृती ग्राहक मंच रायगड पनवेल शाखा व पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या (माहिती अधिकार शंका व समाधान )या विषयावरील व्याख्यानाच्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले मनमोहन सिंग सरकारने केंद्रीय माहिती अधिकार कायदा आणला, 2005 ते 2010 पर्यंत हा कायदा प्रभावी होता त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना हा कायदा अडचणीचा वाटू लागल्याने त्यांनी माहिती आयुक्त ची नेमणूक करण्यास चालढकल केले तथापि सततच्या पाठपुराव्याने व वरिष्ठ पातळीवर तक्रार करून माहिती प्राप्त करून घेता येते व त्या माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंबंधी अर्ज करता येतो तसेच दप्तर दिरंगायी कायदा व सेवा हमी कायदा च्या देखील आधार घेता येतो.
श्री अनिलजी गलगली यांनी कायद्याच्या तरतुदीत विश्लेषण करून सांगितले अर्जाचा तपशील प्रथम व द्वितीय अपीला बाबत तरतुदी याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले शेवटी त्यांनी सांगितले की प्रत्येकाने एक तरी माहितीचा अधिकाराचा अर्ज करावा दिवसातून दहा मिनिटे वेळ काढून गव्हर्मेंट साइटवर जाऊन विविध विभागाचे सुधारित आदेशांचे अवलोकन करा तुम्ही सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर दाते आहात तेव्हा तुमच्या हक्काविषयी तुम्ही जागरूक असायला हवे, श्रोत्यांच्या प्रश्नांना श्री अनिल गलगली यांनी समर्पक उत्तरे देऊन श्रोत्यांचे शंका व समाधान केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जनजागृती ग्राहक मंचाचे सचिव श्री बी.पी म्हात्रे सर यांनी केले व त्यांचा परिचय व स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री काशिनाथ जाधव सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय गायकर तर आभार प्रदर्शन शिवदास पालकर यांनी केले प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील सर यांची होती तसेच जनजागृती ग्राहक मंच रायगड चे जिल्हा सचिव नितीन पाटील सर जिल्हा उपाध्यक्ष सुनील वैद्य सर संपर्क व प्रसिद्धीप्रमुख संतोष विचारे पनवेल शाखा उपाध्यक्ष सुभाष फडके रमेश चव्हाण दिलीप मोरे सुभाष मेहतर तसेच रासायनी शाखा अध्यक्ष संदीप पाटील निवृत्त सेवक मंडळाच्या सुनंदा पाटील यशवंत सकपाल व इतर अनेक उपस्थिती होती राजकुमार तागमोगे यांनी कार्यक्रमाच्या यश रिचतेसाठी विशेष परिश्रम घेतले.