मंत्रालयाने आरटीओशी संबंधित एकूण 58 सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
गणेश राऊळ :
https://chat.whatsapp.com/GeGJEVQbUqc6U4dNLpT5Q8
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ऑनलाइन सेवांची संख्या 18 वरून 58 करण्यात आली आहे. या संदर्भात MoRTH ने 16 सप्टेंबर 2022 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, मंत्रालय नागरिक केंद्रित सुविधा आणि सुधारणांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. अशाप्रकारे संपर्काशिवाय आणि ऑनलाइन सेवांमुळे (RTO Online Services) लोकांचा वेळ खूप वाचेल. यासोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयावरील कामाचा ताणही कमी होईल. याशिवाय कामाचा दर्जाही चांगला राहील.
या नवीन सुविधेत अनेक नवीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये आधार किंवा आधारशी संबंधित प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) आवश्यक आहे. आता तुम्हाला लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स (Duplicate Driving License) तयार करणे, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, गाडीचे रजिस्ट्रेशन करणे, यासारख्या अनेक सेवांचा समावेश आहे. या सेवांसाठी तुम्हाला आता आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही आणि तुम्ही घरबसल्या या सेवांसाठी अर्ज करू शकता.
आधार कार्डशिवाय होऊ शकेल काम
दरम्यान, यासोबतच परिवहन मंत्रालयाने सांगितले आहे की, तुमच्याकडे आधार नंबर नसला तरीही तुम्ही सेंट्रल मोटर व्हेईकल रूल (CMVR) 1989 च्या नियमांनुसार तुमचे काम सहज करू शकता. यासाठी तुम्हाला आधारऐवजी इतर कागदपत्रे द्यावी लागतील. यामध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी अनेक प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे.
- Mr. GR