व्हॉटसअप , Chatbot सुविधा क्रमांक ८८८८२५१००१
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांमार्फत अनेक प्रकारचे कामकाज करण्यात येत असून विविध सेवासुविधा दिल्या जातात. पुणे मनपाच्या विविध नागरी सेवा सुविधा तसेच महापालिकेशी संबंधित विविध घडामोडींची अद्ययावत माहिती, जलदरित्या व सहजपणे नागरिकांना उपलब्ध होणेच्या अनुषंगाने Chatbot द्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून नागरीकांना पुणे मनपाच्या सेवा-सुविधा Chatbot द्वारे अत्यंत सहजपणे विनाविलंब व योग्य प्रतिसाद द्वारे २४*७ मिळणे शक्य होणार आहे. सद्यस्थितीत खाली नमूद केले प्रमाणे मिळकत कराशी संबंधित सेवा व्हॉट्स अॅप Bot द्वारे पुणे महानगरपालिकेच्या नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभाग, पुणे महानगरपालिका , पुणे महानगरपालिका Whatsapp ChatBot सुविधा मिळकत कराशी संबंधित सेवा:
• देय व देय रक्कम मिळकत कराची भरलेली आणि देय रक्कम ,
कराची पावती काढा: थकबाकी नसल्यास मिळकत कराची पावती काढा
NOC प्रमाणपत्र : थकबाकी नसल्यास NOC प्रमाणपत्र काढा
● ऑनलाईन पेमेंट: थकबाकी असल्यास मिळकत कराचा ऑनलाईन भरणा
कर बिल: मिळकत कर बिल मिळवण्यासाठी लिंक
• वापरकर्ता नोंदणी: वापरकर्ता त्यांचे फोन नंबर आणि इमेल आयडी प्रोपर्टी आयडीशी लिंक करू शकतो
• फोन नंबर द्वारे मिळकत कर भरा: नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे नागरिक मिळकत कर आयडी मिळवू शकतात
कर कल्क्युलेटर अंदाजे मिळकत कर मोजणे करिता.
स्व-मुल्यांकन: नवीन मिळकत/अतिरिक्त बांधकामासाठी नोंदणी करा तसेच भविष्यात पुणे मनपाच्या नागरिकांकरिता पुणे मनपाच्या विविध विभागाकडील नागरी सेवा सुविधा विविध विभागाकडील नागरीकाभिमुख माहिती नागरिकांना Chatbot द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.