प्रेस मीडिया लाईव्ह :
जब्बार मुलाणी
पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे अंमली पदार्थ विरोधी पथक - १ पथकातील स्टाफसह कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार यांना बातमी मिळाली की, स.नं. २८/१/१ निंबाळकर वस्ती, येवलेवाडी, कोंढवा, पुणे याठिकाणी एका बंदिस्त जागेत शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ पान मसाला गुटखा हा विक्रीसाठी साठवुन ठेवला असुन तो सर्व माल आज तेथुन विक्री करीता .हलविणार आहेत. प्राप्त माहितीचे आधारे सदर ठिकाणी छापा टाकुन इसम नामे नेमाराम लच्छाराम प्रजापती, वय-३८ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०६, दत्त विहार सोसायटी, येवलेवाडी, पुणे याचे ताब्यातुन ५,२९,२१० /- रु किचा गुटखा हा तंबाखुजन्य पदार्थ असा माल विक्रीसाठी ठेवलेला असताना मिळुन आल्याने, त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ९४५ / २०२२ भादवि कलम @1३२८, १८८, २७२,२७३, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम varphi(2) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६ चे कलम 2xi(2)(i)(iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे - १, श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक - १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, सुजित वाडेकर, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.