डॉ. निकाळजे यांच्या ब्रेल इंग्रजी पुस्तकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद......



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:-  डॉ. तुषार निकाळजे यांनी दृष्टिहीन विद्यार्थी, संशोधक व इतर व्यक्ती यांच्या उपयुक्ततेसाठी "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी"  हे ब्रेल-  इंग्रजी पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. विद्यापीठांच्या विभागनिहाय कामकाजाची माहिती या पुस्तकांमध्ये दिली  आहे. या इंग्रजी भाषेतील ब्रेल पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड  मध्ये झाली  आहे. या पुस्तकाच्या छपाई व निर्मितीचा खर्च डॉ. निकाळजे यांनी स्वत:  केला आहे. 

    



   "हे पुस्तक इंग्रजी  भाषेत असल्याने जगातील सर्व दृष्टीहीन  विद्यार्थी, संशोधक व इतरांना उपयुक्त ठरेल", अशी आशा डॉ. तुषार निकाळजे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post