प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शिवणे येथील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अमर युवराज दांगट यांचा नुकताच महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने हॉटेल हयात येथे आयोजित विशेष कार्यक्रमात दांगट यांचा हा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, ज्येष्ठ पत्रकार विजय बावीस्कर,उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. योगेश जाधव,इस्कॉन चे गौरगोपाल दास आदि मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक अमर दांगट यांना ऐतिहासिक साहित्य लिखानाची आवड असून डॉ. बाबा आमटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यातही ते सक्रिय सहभागी असतात. राज्यभर फिरून शेकडो प्रबोधन शिबिरे घेतली आहेत. आपल्या घराच्या छतावर आश्रम सुरू करून त्यांनी आजवर २०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिवशक्ती ज्ञानपिठाच्या माध्यमातून शैक्षणिक,राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे.आज ते विद्यार्थी चांगल्या पदांवर रुजू आहेत. ३ हजारांहून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय सुद्धा ते चालवतात यासाठी ते कोणत्याही प्रकारचे अनुदान घेत नाहीत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा साहित्यिक प्रवासही उत्तम सुरू असून आजवर त्यांची ४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडावर त्यांचे संशोधन सुरू असून ५ खंड येणार आहेत त्यापैकी 'रणधुरंधर शहाजीराजे भोसले आणि स्वराज्याची पायाभरणी' या शीर्षकाखाली २ खंड लवकरच प्रकाशित होणार आहेत. ऐतिहासिक संशोधन ते मागील दहा बारा वर्षांपासून सुरू असून त्यातून त्यांनी हजारो कागदपत्रांचा संग्रह आणि संदर्भ ग्रंथ संपूर्ण देशभर फिरून अमर दांगट यांनी जमावाला आहे. दांगट यांच्या याच सामाजिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने त्यांचा सन्मान केला.