मराठवाडा मुक्ती संग्रामदिना प्रित्यर्थ मराठवाडा सेवक प्रतिष्ठान द्वारा आयोजित, 'मराठवाडा रत्न' पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : मराठवाडा मुक्ती संग्रामदिना प्रित्यर्थ मराठवाडा सेवक प्रतिष्ठान द्वारा आयोजित 'मराठवाडा रत्न' पुरस्कार २०२२ दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. यशवंतराव चव्हाण नाट्य गृह कोथरूड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात 'अमरलता' या सुरेल कार्यक्रमाने झाली. मा. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष मसाप पुणे, यांच्या शुभहस्ते, तसेच प्रसिध्द शास्त्रीय गायक संगीतकार श्री. रवींद्र गांगुर्डे, पंडित सुहासजी व्यास, मा. श्री. किशोर सरपोतदार यांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना श्री. मिलिंद जोशी यांनी मराठवाडा विकासापासून वंचितच राहिला आहे कारण योग्य राजकीय नेतृत्वच आता उरले नाही. विकासाची कमी आहे पण आमच्याकडे प्रतिभा खूप आहे. म्हणूनच सर्वच क्षेत्रात आज मराठवाडा वासिय स्वमेहनतिने मोठ्या लेव्हलवर काम करतात असे म्हणाले. पंडित सुहासजी व्यास यांनी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या आपल्या शास्त्रीय मैफिलीचा अनुभव कथन केला. तर अध्यक्षीय समारोप करताना मा. रवींद्र गांगुर्डे यांनी मराठवाड्याच्या भूमीने कला संगीत क्षेत्राची खाण आहे म्हणूनच आज अनेक दिग्गज लोक विविध क्षेत्रात मराठवाडा वासिय कार्यरत आहेत असे विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनकर चौधरी यांनी करताना सांगितले की, निजाम राजवटी विरूध्द लढण्यासाठी गुंजोटी येथे आर्य समाजाची स्थापना झाली. गुंजोटी गाव १९४८ पूर्वी जिल्ह्याचे ठिकाण होते. छोट्याश्या गुंजोटी गावाने ४२ स्वातंत्र्य सैनिक दिले. त्यातील २६ जणांना शिक्षा झाली तर १ वेदप्रकाश आर्य यांच्या रूपाने हैद्राबाद संग्रामात पहिले बलिदान झाले. तर अतिशय सुंदर निवेदन संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. शोभा कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. मनोज पवार यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


* “मराठवाडा रत्न” २०२२ पुरस्काराचे मानकरी : 

विद्यावाचस्पती विद्यानंद शैलेश कुलकर्णी, धाराशिव मराठवाडा धर्म रत्न

मा. प्रा. भाऊसाहेब जाधव सर, लातूर

मा. प्रदिप रोडे, बीड

- मराठवाडा शिक्षण रत्न

मा. डॉ. दामोदर पतंगे, गुंजोटी धाराशिव

मा. डॉ. अमोघ जोशी, संभाजीनगर

मा. पं. कल्याणजी गायकवाड, धाराशिव

मा. सुरज लोळगे, पैठण

मा. श्रमिक गोजमगुंडे, लातूर

मा. अॅड. सतिश देशमुख, बीड

मा. अतुल परदेशी, संभाजीनगर

मा. आदिनाथ गोरे, नायगाव धाराशिव

मा. बबन जोगदंड, नांदेड

मा. विश्वास शाईवाले, गुंजोटी धाराशिव

- मराठवाडा शिक्षण रत्न

- मराठवाडा वैद्यकिय रत्न

- मराठवाडा वैद्यकिय स्वर रत्न

- मराठवाडा संगीत रत्न

- मराठवाडा युवा समाज रत्न

- मराठवाडा दुर्गसंवर्धन रत्न

- मराठवाडा विधी रत्न

- मराठवाडा पत्रकार रत्न

- मराठवाडा उद्योग रत्न

- मराठवाडा साहित्य रत्न

- मराठवाडा स्वर रत्न


* “मराठवाडा मित्र" २०२२ पुरस्काराचे मानकरी *

मा. श्री. सुरेशजी कोते व्यवस्थापकिय संचालक श्री लिज्जत पापड म. गृ. उ. समूह .

मा. श्री. प्रविण शेट्टी हॉटेल व्यावयायिक .

Post a Comment

Previous Post Next Post