मांजरी बुद्रुक व मांजरी खुर्द गावांमधील संपर्क तुटला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
खडकवासला धरणातून पाणी विसर्ग केल्याने तसेच पावसामुळे मुळा-मुठा नदीला पूर आला आहे. मांजरी बुद्रुक येथील सबमर्शिबल पुल सलग दुसर्या दिवशीही पाण्याखाली राहिला आहे .त्यामुळे मांजरी बुद्रुक व मांजरी खुर्द गावांमधील संपर्क तुटला. तसेच वाहनचालक व शाळकरी मुलांचे हाल झाले. शुक्रवारी दुपारी चार वाजता पुलावरून पाणी वाहू लागल्या नंतर वाहतूक बंद करण्यात आली आहे.शनिवारी ( दि-१७) सकाळीही पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
आज शनिवारी अनेक शाळांच्या परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना लांबच्या पाल्याने जावून शाळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागली. पूल पाण्याखाली गेल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून असलेल्या थेऊर आणि वाघोली या मार्गांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी चा सामना करावा लागला. थेऊर येथे रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक अंतर्गत छोट्या रस्त्याने वळवली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या वाहनांमुळे या अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तर, वाघोली रस्त्यावर अनेक ठिकाणी काम अर्धवट असून नगर महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.