वेदांत ग्रुपचा उद्योग गुजरातच्या घशात घलणारे शिंदे ,फडणवीस सरकारा विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन.



प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी :

पुणे : महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये नेण्यात आला. राज्यातील युवकांना रोजगार मिळवण्याचे हेतूने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प राज्यातून निघून गेल्यामुळे हतबल झालेले युवकांनी शू पॉलिश करत रद्दी विकत अभिनव स्वरूपाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेले आंदोलनास उपस्थित राहत युवकांच्या मागणीस पाठिंबा दर्शवला व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी युवकांनी यावेळी केली. वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. भाजपशासित गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (एमओयू) केले आहेत ,  महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,असे मत यावेळी मी व्यक्त केले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके ,प्रदीप गायकवाड ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,मनोज पाचपुते,उदय महाले,नानासाहेब नलावडे,भूषण बधे, गोविंद जाधव,कुलदीप शर्मा,अमोल ननावरे,राकेश कामठे ,महेश हांडे,मयूर गायकवाड,स्वप्निल जोशी,किरण खैरे ,गजानन लोंढे,पूजा काटकर आदी सहकारी उपस्थित होते.

Nationalist Congress Party - NCP

Nationalist Congress Party - NCP आदी सहकारी उपस्थित होते.

कुलदीप शर्मा  कार्याध्यक्ष: राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगावशेरी विधानसभा

 

Post a Comment

Previous Post Next Post