प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे प्रतिनिधी :
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेमधील हंगामी शिक्षकांना केवळ १५ हजार मानधन मिळते, तर या उलट पिंपरी - चिंचवड मध्ये २५ हजार मानधन मिळते.त्यामुळे महानगरपालिकेच्या शिक्षकांची अवस्था चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यापेक्षाही बिकट अवस्था असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात खासगी शाळेतील फी मुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांचे आपल्या प्रवेश महापालिकेच्या विद्येच्या शाळांमध्ये घेतले त्या मुळे महानगरपालिका शाळांचा पट वाढला आहे. त्यामुळे २८९ शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आली. तरी देखील त्यातून फक्त १२० शिक्षक सेवेत रुजू झाले. या शिक्षकांना एकवट १५ हजार मासिक पगार दिला जातो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षकांना एकवट २५ हजार मासिक पगार देत आहे. बांधकाम साईटवरकाम करणारे बिगाऱ्याला दररोज ८०० रुपये मिळतात. दररोजची हजेरी १ हजार रुपये आहे. कायमस्वरुपी शिक्षकांना ५० हजारांपेक्षा अधिक वेतन आहेत. सातव्या वेतन आयोगानंतर पगारामध्ये बरीच वाढ झाली आहे. हंगामी शिक्षक कायमस्वरुपी शिक्षकांप्रमाणेच शिकवातात. असे असताना त्यांच्या शिक्षणाचा महानगरपालिका प्रशासना कडुन मस्करी केली जात आहे.