प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ गणेश मंडळ कुमठेकर रस्त्यावरून दोन तास जागेवरून हललेच नाही. त्यामुळे पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत. पाठीमागील मंडळांनी , पोलिसांनी आणि प्रशासनाने वारंवार विनंती करूनही पोटे यांचे मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्त मंडळाचा डी जे बंद करण्यासाठी गेले. मात्र तरीही दीपक पोटे यांनी मंडळ अलका चौकात येताच महापालिकेच्या स्टेजवर जाऊन माईक स्वतः हातात घेतला आणि डी जे लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वःत महापालिकेच्या स्टेजवर गेले आणि त्यांनी डी जे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर पोटे यांचे गणेश मंडळ रात्री बारा वाजता पुण्यातील अलका चौकातून विसर्जनासाठी पुढे गेले.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुका लांबल्याने रात्री बारा वाजेपर्यंत खामगाव शहरात 28 मंडळांपैकी फक्त निम्मेच गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होऊ शकले. रात्री बारापर्यंत फक्त पंधरा गणेश मंडळांचे विसर्जन झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी उरलेल्या गणेश मंडळाचे डीजे बंद करून मिरवणूक आटोपत्या घेतल्या. उरलेल्या गणेश मंडळ यांचे रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जन झाले. खामगाव शहरात 28 गणेश उत्सव मंडळाचे गणपती रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जित झाले. लांबलेल्या मिरवणुका यावेळी गणेश विसर्जन उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं. जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडलं.