प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे फेस्टिवलमध्ये तब्बल 8 वर्षांनंतर सुरेश कलमाडी पुढाकार घेताना दिसत आहेत. पण यावेळचा सर्वात मोठा फरक म्हणजे पुणे फेस्टिवलच्या व्यासपीठावर काँग्रेस ऐवजी चक्क भाजपचे नेते चमकताना दिसू लागलेत, त्यामुळे यावर्षीचा पुणे फेस्टिवल भाजपने हायजँक केला नाही ना असा आरोप होऊ लागला आहे. पुणे फेस्टिवलचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी पुन्हा सक्रीय झाल्याने यंदाचा पुणे फेस्टिवल अगदी दिमाखात साजरा होत आहे. पण या फेस्टिवलच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच काँग्रेस ऐवजी भाजपचे नेते झळकताना दिसत आहेत. कलमाडी काँग्रेसचे नेते असूनही त्यांच्याच पक्षाच्या एकाही मोठ्या नेत्याला निमंत्रण नाही. याबद्दल पुण्याच्या राजकीय वर्तुळात फक्त आश्चर्यच व्यक्त होत नाही तर भाजपने हा महोत्सव हायजॅक केल्याचा गंभीर आरोप होत आहे.
काँग्रेसचे नाना पटोलेही काहीसे असच सुचवू पाहत आहेत. भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही याकडे फक्त फेस्टिवल म्हणून बघतो. असा दावा ते करतात.