पुण्याच्या सभेत खासदार संजय सिंह यांचे वक्तव्य.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे काल झालेल्या आपच्या जाहीर सभेत खा. संजय सिंहांनी भाजप आणि मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवत ते म्हणाले की , मोदी सरकार हे जुमल्यांचे सरकार आहे. जनतेला मोठमोठी आश्वासने दिली आणि आता निलाजरेपणाने तो एक जुमला होता, अस सांगितलं जात आहे . लाख दीड लाखाचे कर्ज मिळवण्यासाठी सामान्य नागरिकाला बँकाचे खेटे मारावे लागतात. मात्र मोदींनी आपल्या दोस्तांना लाखो कोटींची कर्जे दिली व ती माफही केली.
मोदी सरकार हे अडाणींना जगातील नंबर एकची श्रीमंत व्यक्ती बनवण्यामध्ये मश्गुल असताना अरविंद केजरीवाल हे भारतातील सर्वसामान्यांना नंबर वन बनवण्यात प्रयत्नशील आहेत असे मनोगत *खासदार संजय सिंह* यांनी व्यक्त केले. लाखो करोडोचे कर्ज घेवून कर्ज बुडवे देश सोडून पळाले, सुस्मिता सेनला ललित मोदी सापडतो मात्र सरकारला तो सापडत नाही असा टोला त्यांनी लगावला. भाजप सरकारने आपल्या दोस्तांच्या १२ लाख कोटींची कर्ज माफी करून बँका रिकाम्या केल्या आहेत. २०१४ मध्ये अदानीची संपत्ती ५० हजार करोड होती २०२२ मध्ये त्याची संपत्ती १० लाख करोड आहे . एका बाजूला अदानी जगातला दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत बनले आहेत आणि त्याच वेळी भारत उपासमारीच्या यादीत पुढे जात आहे. बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे. सर्वसामान्य माणूसाचे जगणे कठीण झालय. देशाची तिजोरी भरणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारी शाळा बंद पडत आहेत त्यासाठी सरकार कडे पैसा नाही. गरिबाच्या घासावर टॅक्स लावून , मोदी श्रीमंत उद्योगपती मित्रांना रेवड्याची खैरात वाटत आहेत. या सरकारला सत्तेवून खाली खेचण्याची वेळ आली आहे, जगणे महाग करणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही. पुण्यात मनपा प्रशासन भ्रष्ट आहे. स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडाला आहे. येत्या निवडणुकीत भ्रष्टाचार मुक्त सुशासनासाठी आपला निवडून देण्याचा आवाहन त्यांनी केले.
या सभेला महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले *आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील* यांनी देखील संबोधित केले आणि आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील कामाचे कौतुक केले. भास्कर राव पेरे पाटील यांनी आपल्या भाषणात सत्तेत मूर्ख बसल्यामुळे जनतेचे हाल सुरू आहे . शेतकऱ्याला मेल्यावर मदत करणे हास्यास्पद आहे . मात्र त्याला जिवंत पणी जगू देत नाहीत. दर्जेदार शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा दिल्लीत मिळत आहेत हे आपण स्वतः पाहून आल्याचे त्यांनी सांगितलं . केजरीवाल ही फक्त व्यक्ती नसून तो विचार आहे आणि तो समाजात देशात रुजला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. चांगल्या कामाला नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे या भावनेतून आपण आम आदमी पक्ष, अरविंद केजरीवाल यांच्या कामाला आपला पाठिंबा आहे असे मनोगत भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक* म्हणाले की महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्यात मात्र महाराष्ट्रातील सत्ताधीश सत्ता मिळवण्यात मश्गूल आहेत. काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. भाजपला भीती आहे ती फक्त केजरीवाल आणि आपची. केजरीवालांची मेक इंडिया नंबर 1 ही संकल्पना अमलात आणण्यासाठी आप सत्ता येणे महत्त्वाचे आहे.
आप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, जात-पात, धर्म याच्या आधारे बुद्धिभेद, मनभेद करणाऱ्या शक्तींचा जोरदार मुकाबला करा. तर *राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन* यांनी पुण्यात पक्षाच्या चाललेल्या कामाचे कौतुक करत जनतेच्या प्रश्नांसाठी सतत अग्रेसर राहण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
राज्य संघटक आणि या सभेचे निमंत्रक विजय कुंभार हे आपल्या भाषणात म्हणाले की , पुणेकरांना हवंय स्वच्छ पाणी , वाहतूक कोंडी मुक्त व खड्डे मुक्त रस्ते, चांगली आरोग्य सेवा , स्वच्छ्ता आणि भ्रष्टाचार मुक्त सुशासन .. राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, तुम्ही वार्डची संख्या वाढवा, घटवा , त्याची नव्याने रचना करा पण निवडणुका तर घ्या ... आम्ही सर्व जागा लढवू व जिंकून ही दाखवू . नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले की आपले मत पुण्याला आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी द्या , दिल्लीच्या धर्तीवर पुण्यातही दर्जेदार आणि मोफत शिक्षण मोफत आरोग्य सुविधा, कचरा मुक्त पुणे करण्यासाठी मत द्या.
आप प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी सभेचे प्रस्ताविकपर भाषण करताना पुणे शहरातील समस्यांची व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची जंत्री सांगत नागरिकांना आपचा झाडू हातात घेण्याचे आवाहन केले.
यावेळी *आपचे राज्य सह संयोजक किशोर मंध्यान, राज्य सचिव धनंजय शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, आम आदमी शेतकरी संघटनेचे बिपीन पाटील, बाबासाहेब जाधव, संदीप पाटील, आप आरोग्य विभागाचे डॉ अमोल पवार, विनोद घरत, संदीप सोनावणे, आप शहर संघटक एकनाथ ढोले, शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, प्रवक्ते कनिष्क जाधव यांच्यासह पुणे शहरातील अनेक पदाधिकारी* उपस्थित होते. जोरदार पाऊस असताना देखील लोक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
यावेळी कुमार धोंगडे, जगदीश ठोमके संचलित आम आदमी रुग्णवाहिकेचे उद्घाटन संजय सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे आप ची खा.संजय सिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेली जाहीर सभा दोन दिवसाच्या संततधार पावसाच्या व्यत्यया नंतरही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे यशस्वी झाली. किरण कद्रे व प्राजक्ता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर सुदर्शन जगदाळे यांनी आभार प्रदर्शन केले.