प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांनी नुकताच आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश केला.यावेळी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदिप देसाई , उपाध्यक्ष सुदर्शन कदम , जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांना आम आदमी पार्टीच्या युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.
इचलकरंजी येथील अभिषेक पाटील हे सातत्याने शहरातील विविध सामाजिक प्रश्नांविषयी आवाज उठवून त्याच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात.याशिवाय शहरातील विविध ठिकाणच्या नागरिकांच्या मुलभूत नागरी समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्यासाठी ते सक्रिय असतात.नुकताच त्यांनी आम आदमी पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदिप देसाई , उपाध्यक्ष सुदर्शन कदम , जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांना आम आदमी पार्टीच्या युवक जिल्हा उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. तसेच त्यांचा करुन त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी त्यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याबरोबरच शहरातील विविध मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहू आणि आम आदमी पार्टी अधिक भक्कम होण्यासाठी निश्चित प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा काणेकर , हातकणंगले तालुकाध्यक्ष इंद्रजीत कोळी , शहराध्यक्ष प्रकाश सुतार , उपाध्यक्ष जावेद मुल्ला , सचिव वसंत कोरवी , खजिनदार रावसाहेब पाटील ,मोईन मोकाशी , अभिजीत कांबळे , अब्दुल बस्तवाडे , नारायण अवघडे यांच्यासह पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.