चांदणी चौकातील जुना पूल पाडणार असल्यामुळे मुंबई बेंगलोर महामार्गावरील वाहतुकीत बदल
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड वाहतुकीत बदल ,बचांदणी चौकातील जुना पूल पडणार असल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एक ऑक्टोबर रात्री 11:00 वा. पासून ते 2 ऑक्टोबर सकाळी 8:00 वा. पर्यंत रात्री वाहतुकीत बदल करण्याचे आदेश आहेत.
आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड शहर यांनी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत
कसा असणार वाहतुकीत बदल
*मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उर्से तोल नाका पासून चांदणी चौकाकडे जाण्यास बंदी करण्यात येत आहे.*
*मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुस खिंड येथून चांदणी चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.*
*मुंबईकडून पुणे सातारा कडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चार चाकी वाहनांकरिता पर्यायी रस्ता*
नियोजित पर्यायी मार्ग
*मुंबईकडून येणारी सर्व प्रकारची वाहने उरसे टोल नाका येथून सेंट्रल चौक मार्गे जुन्या मुंबई – पुणे हायवे मार्गे भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, पुणे मार्गे इच्छित स्थळी जातील.
वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरून विद्यापीठ मार्गे इच्छित स्थळी जातील.
भुमकर चौकातून डावीकडे वळून डांगे चौक मार्गे रक्षक चौक,* *राजीव गांधी पुलावरून औंध, शिवाजीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील
*पिवळी चौकातून रावेत डांगे चौक मार्गे रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरून औंध*, *शिवाजीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोड नाही पुणे विद्यापीठ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील*