प्रेस मीडिया लाईव्ह :
बहुचर्चित तळेगाव येथील वेदांत फॉक्सकाँन कंपनीचा 1 लाख 54 कोटींचा सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरात सरकारने पळवला आहे.मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राचे आर्थिक,औद्योगिक क्षेत्रात खच्चीकरण करण्याचे धोरण केंद्रातून राबवले जात आहे.
2014 पासून महत्वाची आर्थिक केंद्रे गुजरात मध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत.नरेंद्र मोदी,अमित शहा यांनी सर्व काही गुजरातसाठी हे धोरण राबवले आहे .2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली युती सरकार आल्यानंतर महाराष्ट्र द्वेष हाच एकमेव कार्यक्रम भाजपच्या आमदार खासदारांमार्फत राबवण्यात आला.केंद्राच्या तालावर नाचण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले.
आता नव्या 'ईडी'सरकार मधील मंत्री आमदार हे मोदींच्या गुजरात साठी काम करत आहेत.औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र मागे रहावा,म्हणूनच 1 लाख रोजगार देणारा वेदांत फॉक्सकाँन कंपनीचा प्रकल्प गुजरात मध्ये पळवला आहे.महाराष्ट्रातील विद्यमान सरकार मोदी शहा यांच्या पालखीचे खांदेकरी आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस दीपक गुप्ता यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.