चिखली प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड ; अपना वतन संघटनेची तक्रार



प्रेस मीडिया लाईव्ह 

अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड येथील  सेक्टर न १८ , शिवतेजनगर , ( खदान ) परिसरामध्ये विनापरवाना अवैधरित्या वृक्षतोड सुरु असल्याबाबत अपना वतन संघटनेला तक्रार प्राप्त झाल्यांनतर अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख , पिंपरी चिचंवड शहर कार्याध्यक्ष हमीद शेख , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , नीरज कडू यांनी सदर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ४० झाडे तोडल्याचे व त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर बाबत उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे व उद्यान अधीक्षक गोस्वामी साहेबाना फोन करून याबाबत कल्पना दिली . तसेच मा. आयुक्त साहेब , पिंपरी चिंचवड महानगरपालिका , उद्यान अधीक्षक यांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे. 

  अपना वतन संघटनेने मागील काही दिवसांपूर्वी फॉर्मायका कंपनीतील अवैध वृक्षतोडीबाबतचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर कंपनी मालकाला ४५ लाखाचा दंड थोटवण्यात आला होता . हे प्रकरण ताजे असतानाच चिचंवड मध्ये अशा प्रकारेच मोठ्या प्रमाणावर वृक्षांच्या कत्तली करून त्यांची वाहतूक व विक्री करण्यात येत आहे. सेक्टर न १८, ओयो सिल्व्हर की हॉटेल , शिवतेजनगर , चिखली प्राधिकरण ,चिचंवड ( खदान ) याठिकाणी असलेल्या शेकडो झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी बऱ्याच वर्षांपासूनची आंबा , सागवान ,लिब , बाभूळ , पिंपळ , वडाची जुनी झाडे अस्तित्वात आहेत . मात्र उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे  ठेकेदारांकडून येथील वृक्षांची मोठ्या प्रमाणवर वृक्षतोड चालू आहे. एकीकडे शासनस्तरावर वृक्ष लागवडीचे संवर्धनाचे उपक्रम सुरु असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वृक्षतोड दुर्लक्ष केले जात आहे.  संबंधितांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975  कलम ८(१) चे उल्लंघन केले आहे. वृक्षतोड करून संबंधितांनी पर्यावरणाची मोठी हानी केली आहे.त्यामुळे या ठिकाणचे जागा मालक , वृक्षतोड करणारे व वृक्षांची वाहतूक करून विक्री करणारे व ते वृक्ष विकत घेणारे वखारीचे मालक या सर्वांची सखोल चौकशी करून  गुन्हे दाखल करावेत .  तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून तात्काळ या ठिकीणच्या वृक्षतोडीचा  पंचनामा करून तात्काळ कारवाई करण्यात यावी.अशी मागणी अपना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पालिकेने दंडाबरोबरच गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे संघटनेच्या वतीने म्हंटले आहे. 


    अन्वरअली शेख

प्रेस मीडिया लाईव्ह

Post a Comment

Previous Post Next Post