प्रेस मीडिया लाईव्ह :
जुलै पासून सतत पडत असलेल्या पावसामुळे कुदळवाडी ते मोई फाटा या सर्वात जास्त रहदारीच्या आणि गजबजलेल्या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे,या रस्त्यावर पेट्रोलपंप, पोलिस चौकी,किराणा दुकाने,हाऊसिंग सोसायट्या,बँक एटीएम,स्क्रॅप कलेक्शन दुकाने,वर्कशॉप,वजन काटा,हॉटेल्स आहेत.या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यामुळे दुचाकी,चारचाकीचे मोठे अपघात होऊन मृत्यु होऊ शकतो.
येथे स्ट्रीट लाईट बंद आहेत,त्यामुळे रस्त्याची दृश्य मानता कमी झाली आहे. चिखली,कुदळवाडी,पवारवस्ती,मोईफाटा अंतर्गत भागातील सर्व रस्त्याची विशेष पाहणी करून तत्काळ रस्ते विकसित करावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस दीपक गुप्ता यांनी आयुक्त शेखरसिंह यांचे कडे केली आहे.