प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागात आणि विभागात खत कुंडी प्रकल्प राबविण्यासाठी खत कुंड्या बांधणे आणि त्याकामी प्रशिक्षित कामगारांची नेमणूक करण्याची मागणी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यानी आयुक्तांकड़े निवेदनाद्वारे केली आहे.
अमृत महोत्सव २०२२-२३ या वर्षा करीता पनवेल महानगरपालिकेला केंद्र शासनाकडून आर्थिक निधी मिळणार आहे. पालिका क्षेत्रातील कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करावी. त्यासाठी अमृत महोत्सव अंतर्गत प्रत्येक प्रभागात आणि विभागात खत कुंड्यांची आवश्यकता आहे. खतकुंड्या बांधून कचरा गोळा आणि वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मित करण्यासाठी प्रशिक्षित कामगारांची एक वेगळी टीम कार्यरत ठेवावी. या खताचा योग्य वापर होउ शकतो. प्रत्येक प्रभागात निदान १० खत कुंड्या बांधून त्यावर प्रत्येकी एका खत कुंडी मागे ५ कामगारांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी माजी विरोधी पक्षनेता प्रितम जनार्दन म्हात्रे यानी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.