प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी दिल्ली : भारतात बहुप्रतिक्षित फाइव्ह जी सेवा आज पासून सुरू होत आहे. राजधानी नवी दिल्ली येथील प्रगती मैदान आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फाइव्ह-जी सेवेला प्रारंभ होणार आहे.
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडियन मोबाईल कॉंग्रेस (आयएमसी) च्या सहाव्या पर्वाचे देखील उद्घाटन करणार आहेत. एक ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना न्यू डिजिटल युनिव्हर्स आहे.
भारतातील रिलायन्स जिओ आणि एअर टेल सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी दिवाळीपर्यंत देशात फाइव्ह जी सेवा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. सुरवातीच्या टप्प्यात निवडक शहरात फाइव्ह जीची सेवा मिळणार आहे. कालांतराने देशातील सर्वच देशात फाइव्ह जीची सेवा उपलब्ध होणार आहे नवी दिल्लीत होणाऱ्या इंडियन मोबाईल कॉंग्रेसमध्ये रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी, एअरटेलचे मालक सुनील भारती यासारखे उद्योगपती सहभागी होणार आहेत. देशातील फाइव्ह जीची उलाढाल २०३५ पर्यत ४५० अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या शहरांत सर्वप्रथम 5-जी सेवा
5-जी सेवा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आदी मेट्रो शहरांचा समावेश आहे. त्यानंतर दोन वर्षांत 5-जी कनेक्टिव्हिटी देशभरात वेगाने विस्तारली जाईल. पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, मुंबई, पुणे, बंगळूर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता आणि लखनौ या 13 शहरांमध्ये 5-जी सेवा सुरू केली जाणार आहे.