प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी दिल्ली : ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची आता या पुढे खैर नाही, असा स्पष्टच इशारा आयकर विभागाने दिला आहे. त्यामुळे यापुढे 'ऑनलाईन गेमर्स' आयकरच्या रडारवर आले आहेत. 3 वर्षांत 58 हजार कोटी जिंकले आहेत. त्यामुळे आता कर भरा अन्यथा कडक कारवाई होणार, असा स्पष्ट इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला आहे.
गेल्या 3 वर्षांत ऑनलाईन गेमच्या माध्यमातून तब्बल 58 हजार कोटी रुपयांच्या रकमेचं वितरण बक्षिसापोटी झालेले असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेनं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला दिलीय. त्यानुसार आता मंडळाने हा कारवाईचा इशारा दिला आहे. वेबसाईट आणि मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन गेम खेळत पैसे कमाविणारे आता आयकर विभागाच्या रडारवर आलेत. या लोकांनी बक्षिसासाठी मिळविलेली रक्कम स्वत:हून जाहीर करत त्यावर लागू असलेला कर भरणा करावा अन्यथा त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिला आहे.