महत्त्वाचे : ATM मधून पैसे बाहेर आले नाहीत पण खात्यातून कट झाल्यास काय करावे


प्रेस मीडिया लाईव्ह :

गणेश राऊळ : 

सर्व ATM धारकासाठी महत्वाची सूचना:- उदा. उत्तम एटीएममधून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वॅप करून पिन टाकला आणि 10 हजाराची नोंद केली. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कट झाले, मात्र एटीएममधून पैसेच बाहेर आले नाही. त्यानंतर उत्तम संबंधीत बँकेत गेला आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्याने प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्याला 10,800 रुपये परत केले. म्हणजेच 800 रुपये जास्त.जर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल ?

माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 7 सोप्या स्टेप्समध्ये...

https://chat.whatsapp.com/GeGJEVQbUqc6U4dNLpT5Q8

सर्वात पहिले आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात -

1- आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कट झाले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाहीत, अशा प्रसंगी 7 दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटेलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत बँक 100 रुपये प्रति दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल. 

2- ट्रांझॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार केल्यावर सुध्दा एटीएम यूजरला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते. 

स्टेप 1:

एटीएम स्लीप अथवा अकाऊंट स्टेटमेंटसंबंधीत बँकेच्या शाखेत तक्रार करावी.

एटीएम मशीनमध्येच संबंधीत शाखा आणि मॅनेजरचे नाव आणि नंबर लिहिलेला असतो. 

स्टेप 2:

ट्रान्झेक्शनच्या 30 दिवसांच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुमच्या एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रान्झेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे.

स्टेप 3:

ब्रँच मॅनेजरकडून बँकेचा स्टॅम्प आणि स्वाक्षरीसोबत तक्रारीची पोचपावती नक्की घ्या. ही प्रत 100 रुपये प्रती दिवस या भरपाईसाठी खुप महत्त्वाची आहे.

स्टेप 4:

तक्रारीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत पैसे न आल्यास एनेक्जर - 5 फॉर्म (//rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/170811AN_5.pdf) हा फॉर्म भरून मॅनेजरला द्या.

ज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे तेथेच हा फॉर्म जमा करायचा आहे.

स्टेप 5:

बँक एनेक्जर-5 फॉर्म भरण्याच्या तारखेपासूनच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येईल पर्यंत प्रति दिवस 100 रुपये या प्रमाणे भरपाई देईल. अकाऊंटमधून कापलेल्या पैशांसोबतच भरपाईची रक्कमसुध्दा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येते.

उदाहरणार्थ, तुमच्या अकाऊंटमधून 10 हजार रुपये कापले गेले, मात्र ते एटीएममधून बाहेर आले नाही. जर तुम्ही 5 एप्रिलला एनेक्जर-5 भरला आहे आणि पैसे 20 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर तुमच्या खात्यात 11500 रुपये येतील. यामध्ये 15 दिवसांचे 1500 रुपयांची भरपाई देण्यात येईल.

स्टेप 6:

जर बँक पेनल्टी देत नसेल तर आरबीआय च्या बँकींग ओम्बड्समॅनला https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm वर ऑनलाईन तक्रार करू शकता.

फोनवरूनसुध्दा तक्रार करू शकता. ओम्बड्समॅनचे नाव आणि फोन नंबर जाणून घेण्यासाठी https://www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=164 वर जा...

स्टेप 7:

तक्रारीच्या आधारे आरबीआय ओम्बड्समॅन संबंधीत बँकेला उत्तर मागेल.

- बँकेकडून देण्यात आलेले उत्तर आणि सपोर्टींग पुरावा तपासला जाईल.

- बँकेची चूक असल्यास बँकेला भरपाई देण्यास आरबीआय सांगेल

Post a Comment

Previous Post Next Post