प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : प्रसिद्ध जॉन्सन अॅंड जॉन्सन बेबी पावडर बनवणाऱ्या कंपनीचा उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाने रद्द केला आहे. मे जॉन्सन अँड जॉन्सन या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादन केलेल्या 'जॉन्सन बेबी पावडर' या सौंदर्य प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील अन्न व औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी घेतले होते.मात्र या पावडरच्या वापराने नवजात बालकाला त्वचेस हानीकारक असल्याने या कंपनीचा उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवजात बालकांसाठी जॉन्सन अॅंड जॉन्सन बेबी पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पंरतु, या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत दोष असल्यामुळं सदर उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार नाहीय. त्याच्या वापराने नवजात शिशू व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अशाप्रकराचे उत्पादन सुरू ठेवणे हे बालकांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या संस्थेच्या मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा 'जॉन्सन अॅंड जॉन्सन' बेबी पावडर या उत्पादनाचा परवाना आजच्या आदेशान्वये कायम स्वरूपी रद्द करण्यात आला आहे.