मुसळधार पावसामुळे स.न.४२,नुरानी काॅलनी परिसरात पावसाचे पाणी साचुन झाली आपत्तीजन्य परिस्थती

 या सर्व समस्येवर लवकरात-लवकर कायमचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार .. एड.हाजी अब्दुल गफुर पठाण


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोंढवा : मागील ३-४ तासात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे स.न.४२,नुरानी काॅलनी परिसरात पावसाचे पाणी साचुन आपत्तीजन्य परिस्थती निर्माण झाली. या बाबत मला कळताच प्रत्यक्ष ठिकाणी तात्काळ माझ्या टीमसह उपस्थित राहुन फायर ब्रिगेड, मनपा प्रशासन,मनपा आयुक्त,आमदार चेतन तुपे पाटील या सर्वांना संपर्क केला व लवकरात-लवकर आलेली आपत्ती दुर करुन या समस्येवर त्वरित कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे .

  लवकरच या सर्व समस्येवर पाठपुरावा करुन लवकरात-लवकर कायमचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे व नागरिकांसमवेत मोठ्या प्रमाणावर महापालिकेवर आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल एड. हाजी अब्दुल गफुर पठाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post