अंबाबाईचे दर्शन आता सर्वांनाच रांगेतून



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे तातडीने विना रांगेत दर्शन घ्यायचे असेल तर दोनशे रुपये घेऊन पास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला होता. मात्र, न्यायालयाने त्याला परवानगी नाकारल्याने आता सर्वांनाच  रांगेतूनच देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे. दरम्यान, व्हीआयपी भाविकांना स्वतंत्र रांग नको असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन तातडीने घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यंदा पेड इ पास देण्याचा निर्णय घेतला होता. दोनशे रुपये घेऊन हा पास दिला जाणार होता. यासाठी स्वतंत्र दरवाज्यातून त्यांना आत प्रवेश दिला जाणार होता. पण यास कोल्हापुरातील काही संघटनांनी जोरदार विरोध केला. ज्याना तातडीने दर्शन पाहिजे त्यांना दर्शन मिळेल आणि देवस्थान समितीला चांगला निधी मिळेल असे सांगून ई पास देण्याचा घाट घालण्यात आला. त्याला विरोध झाल्यानंतरही तो रेटण्याचा प्रयत्न झाला. मात्र अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.  

या निर्णयास दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघेल यांनी परवानगी नाकारली आहे. पेड पास बरोबरच व्हीआयपी साठी स्वतंत्र दर्शन रांगही केली जाऊ नये असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबत पुजारी गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post