या गोधडीचा अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात 30 तारखेला होणार आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
बानू नदाफ :
कोल्हापूर : संस्कार शिदोरी मंच कोल्हापूर आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठी गोधडी बनवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमा नुसार गेल्या वर्षी दसऱ्या मध्ये गोधडी निर्माण करण्याचे काम चालू झाले जवळ जवळ एक हजार महिलांनी या उपक्रमात मोठ्या आनंदाने सहभाग घेतला आणि त्यानुसार 21 बाय 21 ची ही सर्वात मोठी गोधडी बनून तयार झाली असून जुन्या पध्दतीची ही गोधडी संपूर्ण खनाच्या ,आणि कॉटनच्या नवीन कापडाची बनलेली आहे या गोधडीचा अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात 30 तारखेला होणार असून कुंकूमार्चन सोबत सकाळी 11 वाजता महालक्ष्मी देवस्थान समितीकडे अर्पण करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी गेली वर्षभर मंच च्या स्वस्थापक अध्यक्ष सौ स्मिता खामकर आणि विविध गटाच्या महिलांनी मेहनत घेतली आहे.