दोन हजारांची लाच घेताना पोलिस नाईक नामदेव औदुंबर कचरे यास रंगेहाथ पकडले.

 अटक वॉरंटमध्ये अटक न करता मदतीच्या बदल्यात 2 हजारांच्या लाचेची मागणी नामदेव कचरे यांनी केली होती.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर पोलिस दलात लाच खोरांची मालिका सुरुच आहे. हातकणंगले पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक नामदेव औदुंबर कचरे (वय 36, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.अटक वॉरंटमध्ये अटक न करता मदतीच्या बदल्यात 2 हजारांच्या लाचेची मागणी नामदेव कचरे यांनी केली होती.

सणासुदीच्या काळात कारवाई झाल्याने कोल्हापूर पोलिस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 33 वर्षीय तक्रारदाराविरोधात तक्रारदार न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. या आदेशाची हातकणंगले पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात येणार होती. त्यामुले नामदेव यांनी सदर वॉरंट प्रकरणामध्ये अटक न करता मदत करणेसाठी लाचेची मागणी केली होती.

संबंधित तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध पथकाकडे याविरोधात तक्रार केल्यानंतर आज सकाळी सापळा रचण्यात आला. तक्रारदार व्यक्तीकडून दोन हजार रुपये घेताना पथकाने कचरे यांना रंगेहाथ पकडले. हातकणंगले पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कचरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post